दहावीचा पेपर रद्द होऊन सरासरी मार्क मिळणार ?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने इयत्ता १० वीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. परंतु दिवसेनदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे आता १०विचा भूगोलचा पेपर रद्द करून सरासरी मार्क देण्यात यावे अशी मागणी होत आहे. लॉकडाउन व सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाउन वाढण्याचे संकेत दिसत आहे त्यामुळे हा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीकोणातून हा पेपर रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या संभाषणात केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. राज्यातील १८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिली असून भूगोल सोडता बाकी विषयांची परीक्षा घेण्यात आली आहे. या पार्श्वडभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय केला जातोय. शिवाय ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका पडताळणी अन्‌ फेरपडताळणीचे काम लॉकडाउनमुळे संथगतीने सुरु असल्याने निकालही लांबणीवर पडेल, अशी शक्यगता व्यक्ते होत आहे. भूगोल विषयतील गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या ११वीच्या प्रवेशावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता यावर सरकार कडून काय निर्णय घेतला जाईल याकडे विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष लागून आहे

घटनात्मक अडचणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केवळ दोनच महीने आमदारकी मिळण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *