तेल उत्पादक देशांच्या पायाखालील वाळू सरकरली, तेलाचे भाव प्रथमच शून्यावर येऊन पोहचले.

जगातील कोरोनाच्या महामारीमुळे आतापर्यंत दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था होरपळून निघाली आहे. आज बाजारात कच्च्या तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्यावर आला आहे. त्यामुळे तेल उत्पादक असणार्‍या अमेरिका, रशियासह आखाती देशांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

तेलाच्या किंमतींनी प्रत्यक्षात ताल गाठल्याने तेल उत्पादक देशांची तारांबळ उळाली आहे. अमेरिकेत तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता त्यांच्या समोर तेलाचा साठा करण्याचे मोठे आव्हान आहे. १९४६ नंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन असल्यामुळे वाहतूक व्यवस्था, उद्योगधंदे ठप्प आहे. परिणामी तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांना येणार गती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *