तुम्ही शेतकरी आहात काय ? मग वाचा हे तुमच्यासाठी महत्वाचे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. परंतु या लॉकडाउनच्या काळात कमी धोका असणार्‍या  क्षेत्रांमध्ये काय सुट मिळणार यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शेतीमध्ये आता कापणी व काही दिवसांनी येणारे पेरणीचे हंगाम लक्षात घेता शेती व शेतीलगत कामांना कोरोनमुक्त भागात २० एप्रिल पर्यंत सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात काही आर्थिक उपक्रमांना मर्यादीत सूट देण्यात आली आहे. यासंदर्भातील नियमावली बुधवारी गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. कृषी क्षेत्राला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे महत्वाचे आहे.

कृषि आणि पशुपालन संबंधी सूचना

शेती संबंधित सर्व कामे सुरूच राहतील, शेतकरी आणि शेतमजुरांना कापणी संबंधी कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे.
खते,बियाणे, कीटकनाशके , तयार करणे व वितरित करण्याचे कामे सुरूच राहतील तसेच त्यांची दुकाने खुली असतील.
शेतीशी निगडीत उपकरणांची दुकाने व दुरूस्तीची दुकाने खुली राहतील.
एका राज्यातून दुसर्याा राज्यात कापणीशी संबधित मशीन ने- आण करण्यास बंधन नाही.
मत्स्यपालनशी संबधित वाहतूक सुरू राहील.
दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्लांट्स तसेच त्यांचा पुरवठा सुरू राहील.
गुरांचा चारा, खाद्य व कच्च्या मालाचा पुरवठा सुरू राहील.

या उद्योगांना लॉकडाऊन २.० मधून सूट देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात कार्यरत उद्योगांना सूट (जे महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत येत नाहीत असे)
औषध, फार्मा, वैद्यकीय उपकरणे आणि कच्च्या मालासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधित युनिटसना सूट.
पॅकेजिंग मटेरियलच्या उत्पादन यूनिट्सना सूट.
यावेळी ग्रामीण भागात वीटभट्टीला मिळाली सूट
फूड प्रोसेसिंग युनिट्सना ग्रामीण भागात काम करण्याची परवानगी.
आयटी हार्डवेअर उत्पादनांच्या युनिट्सना सूट.
उत्पादन आणि इतर औद्योगिक संस्थांना सूट, विशेष आर्थिक झोनमधील कारखाने आणि औद्योगिक संस्थांना सशर्थ सूट. निर्यात करणाऱ्या संस्थांना सशर्थ सूट. हे उद्योग सुरू होऊ शकतात, परंतु कामगारांना त्यांच्या आवारात राहण्याची व्यवस्था देखील त्यांना करावी लागेल. कामगारांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी मालक जबाबदार असतील आणि या काळात सोशल डिस्टंसिंग पाळावे लागेल.

आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनांच्या वाहतुकीस परवानगी

 • आपत्कालीन परिस्थितीत, चारचाकी वाहनात चालक सोडून इतर एकच प्रवासी असेल.
 • दुचाकीवर केवळ एक व्यक्ती, म्हणजेच चालकासच परवानगी, उल्लंघन केल्यास दंड.
 • जर एखादी व्यक्ती क्वारंटीन केली गेली असतानाही नियमांचे उल्लंघन करत असेल तिच्यावर आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई होणार.
 • तेल आणि गॅस क्षेत्राचे कामकाज सुरूच राहणार, यासंबंधित वाहतूक, वितरण, साठवण आणि किरकोळ विक्रीशी संबंधित उपक्रम सुरू राहतील. 

बँकिंग, टपाल सेवा

बँकांच्या शाखा, एटीएम, टपाल सेवा कार्यरत राहतील.
ऑनलाइन शिकवणी, प्रशिक्षण आणि दूरस्थ शिक्षणास प्रोत्साहन दिले जाईल.ग्रामीण रोजगारासाठी सूट.
सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन केल्यास मनरेगाच्या कामास परवानगी असेल.
मनरेगामधील सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात येईल.


या वस्तूंच्या वाहतुकीस सूट
 • माल/ मालाची चढ-उतर करणे अशा कामांना सूट.
 • पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादने, औषधे, खाद्यपदार्थ यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस परवानगी असेल.
 • सर्व ट्रक आणि मालवाहू वाहनांना सूट मिळणार आहे. एका ट्रकमध्ये २ ड्रायव्हर्स आणि एक मदतनीस यांना परवानगी आहे.
 • यावेळी ट्रक दुरुस्तीची दुकानांनाही सूट देण्यात आली आहे. ट्रक चालकांना अडचणी येऊ नयेत म्हणून महामार्गही खुले असतील.
 • रेल्वे मालवाहतुकीला सूट कायम आहे.
 • सर्व आवश्यक वस्तूंसाठी पुरवठा साखळीला परवानगी.

या दुकानांना सूट

 • किराणा दुकाने, रेशन दुकाने, फळे, भाज्या, मांस, मासे, कुक्कुटपालन, धान्य, दुग्धशाळेतील व दुधाचे बूथ, गुरांच्या चाऱ्याच्या दुकानांना सूट.
 • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला सूट, डीटीएच आणि केबल सेवेलाही सूट.
 • आयटीशी संबंधीत कंपन्यांना ५० टक्क्यांच्या सामर्थ्याने काम करण्याची परवानगी (हे जोखमेचे क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र नाही)
 • ई-कॉमर्स कंपन्यांच्या कामाला, त्यांच्या ऑपरेटर्सच्या वाहनांना सूट, मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार.

सरकारी कामाशी संबंधित कॉल सेंटरनाही सूट

 • सरकारी कामाशी संबंधित डेटा आणि कॉल सेंटर सेवा.
 • खाजगी सुरक्षा सेवांना परवानगी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *