तुम्ही राजकीय युवा कार्यकर्ते आहात ? मग हे वाचा तुमच्यासाठी उपयुक्त.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.

Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/

Instagram:-  https://t.me/chandatobanda

सध्याची परिस्थिति बघीतली तर आज कित्येक तरुण हे राजकारणात एखाद्या नेत्याचा कट्टर किव्हा एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. राजकारणात काम करणे काही वाईट काम नाही परंतु एखाद्या पक्षाकडून किव्हा नेत्याकडून केवळ स्वार्थासाठी तुमचा वापर होत असेल तर मात्र तुम्ही चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहात हे समजून घेतले पाहिजे. आज कित्येक तरुण राजकरणात सक्रिय आहे. एखादे चुटुक मुटूक पद घेऊन सतत धडपड करत असतात. आपला पक्ष मोठा व्हावा यासाठी सतत धडपडत असतात. आपल्या नेत्यासाठी काहीपण करण्याची तयारी या तरुण कार्यकर्त्यांची असते. परंतु ज्या नेत्या साठी तो तरुण कार्यकर्ता काम करतो. आणि जेव्हा त्याच तरुण कार्यकर्त्याचे एखादे काम अळकते तेव्हा मात्र तोच नेता त्याला ते काम करून देण्यासाठी सतत त्रास देतो आज होईल उद्या होईल. असे सतत सांगत असतो काही नेते तर फक्त २ दिवसाचाच वेळ देतात ( ते काम व्हायला ५ वर्ष लागले तरी चालेल )
त्यामुळे तरुणांनो राजकारणात याचे असेल तर कोणत्याच नेत्याचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करू नका. स्वतच्या कर्तुत्वावर राजकारणात या आणि नेतृत्व करा. ज्यामुळे तुम्ही राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकता व तुमच्या रूपाने समाजाला एक नवीन नेता मिळेल. परंतु तुम्ही जर एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम कराल तर तुम्ही स्वतची ओळख निर्माण करू शकणार नाही. आणि तुमच्या संघर्षाच्या काळात तो तुम्हाला कधीच मदत करणार नाही. परवा एक मित्र भेटला तो एका पक्षाचा व त्यापेक्षा जास्त एका नेत्याचा कट्टर कार्यकर्ता होता. आमचे साहेब हा राजकारणाचा नाही तर काळजाचा विषय आहे असा तो सतत म्हणत असायचा परंतु जेव्हा तो परवा भेटला तेव्हा मात्र त्याची भाषा बदललेली दिसली. १० वर्ष सोबत काम करून काही फायदा झाला नाही असा म्हणत होता. मी सहज विचारलं काय झाल तर तो सांगत होता. साहेबांसाठी खूप काही केल पण जेव्हा माझा कामाची वेळ आली तर साहेब आता लक्ष देत नाही आहे, साहेबांना आता त्यांच्या विरुद्ध काम करणारे जवळचे वाटत आहे, आता साहेबांना आपली गरज नाही आहे, साहेबांना आपण केलेल्या कामांची किंमत नाही आहे. असा तो सांगत होता. म्हणून तरुणांनो हे राजकारणी नेते फक्त तुमचा वापर आपल्या फायद्यासाठी करत असतात म्हणून राजकारणात यायचे असेल तर सांभाळून पाय टाका कारण स्वतच्या फायद्यासाठी लोकांचे आयुष्य खराब करणारे राजकारणी नेते आज राजकारणात आहे. म्हणून आज राजकारणात येतांना आपल्या सामर्थ्यावर, कर्तुत्वावर नेतृत्व निर्माण करून राजकारण करा.

धन्यवाद…….
टिम चांदा टू बांदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *