तुम्ही बेरोजगार आहात काय ? मग वाचा हे तुमच्यासाठी….!

मित्रांनो आपल्या देशात सध्याच्या परिस्थित रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. चांगले शिक्षण घेऊनही आज नोकरी मिळणे खूप कठीण आहे. कारण शिकलेल्या मुलांची संख्या वाढल्यामुळे आता स्पर्धा आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकायचे असेल तर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जास्त आणि काहीतरी वेगळं करणे खूप गरजेचं आहे.

ध्येय  

मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. कारण ध्येयाविना जीवनात वाटचाल करणे खूप निरर्थक आहे. कारण एखादे ध्येय राहिले तर आपण त्या ध्येयाचा पाठलाग करून ते ध्येय प्राप्त करू शकतो. त्याबरोबर आपण आपल्या जीवनात आपले ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करू शकतो. आणि ध्येय असण्याचा पुन्हा एक फायदा  म्हणजे आपण आपले ध्येय ठरविल्यामुळे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये कंफ्यूज होणार नाही.

नोकरी की व्यवसाय

सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात दोन पर्याय असतात. एक म्हणजे नोकरी करायची की स्वतचा व्यवसाय. आजकाल नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे म्हणजे जरा जास्तच कठीण आहे. स्पर्धा खूप वाढत आहे आणि या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरीसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तेव्हाच कुठे नोकरी मिळू शकते. नोकरीमध्ये तुम्हाला रोज कामाला जाऊन महिन्याच्या शेवटी एक ठरावीक रक्कम मिळते त्यातून तुम्हाला आपले जीवन चालवावे लागते. यामध्ये तुम्ही एक चांगले जीवन जगू शकता परंतु तुम्ही त्या पगारात आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. ( कार, स्वत:चे घर,लक्झरी लाईफ, ई. ) कारण नोकरीमध्ये तुमचे उत्पन्न हे मर्यादित असते.

                                                                    आपल्या कडे जर एखाद्या व्यक्तीने व्यवसाय करावं म्हटलं तर भांडवल आलं खूप सारा पैसा आला. आणि एवढं सारी गुंतवणूक करून देखील व्यवसाय चालेल याची शास्वती नाही. असा सामान्यपणे आपला दृष्टीकोण असतो. पण जर एखादा व्यवसाय चांगले नियोजन व चांगला अभ्यास करून केला तर तो व्यवसाय कधीच बुडत नाही. व्यवसायमध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. नोकरीसारखे तुम्ही एखाद्या विशिष्ट वेळेपुरते काम करून आपल्या व्यवसायाला समोर नेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला दिवसरात्र मेहनत करावी लागते. तरच तुम्ही आपल्या व्यवसायाचे पाय रोवू शकता. व्यवसायात तुम्हाला सातत्याने काम करावे लागते तेव्हाच आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हचा व्यवसाय टिकू शकणार. नोकरीच्या तुलनेत तुम्ही व्यवसायात आपले उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. यामध्ये तुमच्या उत्पन्नावर मर्यादा नाही. त्यामुळे स्वत:चा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे.

आधुनिक शेती 

तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतीमध्ये नवनवीन पद्धतीचा वापर करून आधुनिक शेती हा एक उत्तम पर्याय तुमच्या समोर आहे. आज शेती कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे कारण पारंपरिक शेती ही आता बदलून आधुनिक शेती करण्याची गरज आहे. कारण शेतीच्या माध्यमातून एक चांगले उत्पन्न आपण काढू शकतो. त्याच बरोबर शेतीपूरक व्यवसाय करून ज्यादा उत्पन्न देखील मिळू शकते. त्यामुळे शेती करणे हा एक उत्तम पर्याय बेरोजगारांकडे आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा
येथे क्लिक करा ↓
घडामोडी महाराष्ट्राच्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *