तुम्ही फेअर अँड लव्हली लावता ? मग ‘ हे ‘ वाचा तुमच्यासाठी

मोठ्या शहरांपासून ते अगदी लहान खेड्या पर्यंत मोठ्या प्रमाणात सुंदर दिसण्यासाठी फेअर अँड लव्हली वापरणाऱ्यांची संख्या आहे. इतकेच काय तर फेअर अँड लव्हली म्हणजे जणू गोरेपणाशी किंवा उजळपणा असा अर्थ साधला जायचा. परंतु आता हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला फेअर अँड लव्हली याना नावामुळे अनेक वर्णभेदाच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे. अनेकांना या नावावर आक्षेप घेतला होता. फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची. त्यानंतर अखेर कंपनी आपल्या क्रीमच्या नावातून फेअर शब्द हटवलं आहे.

फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीममधून अखेर फेअर हा हटवण्यात आला आहे आहे. फेअर अँड लव्हलीचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने रिब्रँडिंग करत हा निर्णय घेतला आहे. पुढीच्या काही महिन्यात ग्लो अँड लव्हली मार्केटमधून ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. तसेच कंपनीकडून भविष्यात इतरही काही बदल यामध्ये होण्याची शक्यता आहे. फेअर अँड लव्हलीसह कंपनी पुरुषासाठी असलेल्या फेअर अँड हँडसम क्रीमचं नावही बदललं आहे. या क्रीमचं नाव आता ‘ग्लो अँड हँडसम’ असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *