तुम्ही झूम ॲप वापरत आहात काय ? मग ‘हे’ वाचा तुमच्यासाठी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित करण्यात आले आणि ज्याचे काम ऑनलाइन आहे अशांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा देण्यात आली होती. अनेक जण घरून काम करत असल्याने ते ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी झूम ॲप सदृश काही मालवेअर व खोटी ॲप बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगण आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

जर तुम्ही सायबर भामट्यांनी बनविलेले ॲप घेतल्यास तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांना विशेष करून झूम ॲप वापरणाऱ्यांना हे ॲप वापरताना सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. 

झूम ॲप वापरणार्यांवनी पुढील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

झूम ॲप हे अधिकृत वेबसाइट अथवा प्ले स्टोअर वरूनच डाऊनलोड करावे. 

मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत. तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल.

तुम्हाला जो रँडम मिटींग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका.

मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही.

मीटिंगचा आयडी व पासवर्ड सार्वजनिक शेअर करू नये. 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *