तुम्ही कोण आहात हे एक परीक्षा ठरवू शकत नाही, परीक्षांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला.

सीबीएसई १०वी आणि १२वी यांचे निकाल घोषित झाले असून आज महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल दुपारी जाहीर होणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये मोदी म्हणातात – जे विद्यार्थी त्यांच्या CBSE बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या निकालाने समाधानी नाहीत, त्यांना मी सांगू इच्छितो की एक परीक्षा तुम्ही कोण आहात हे सिद्ध करू शकत नाही. तुमच्यातील प्रत्येक विद्यार्थी विविध गुणांनी संपन्न आहे. तुम्ही तुमचं मनमोकळ जगा. कधीही आशा गमावू देऊ नका, नेहमीच भविष्याचा वेध घ्या..तुम्ही खूप चांगलं कराल.

१० वी १२ वीच्या परीक्षांत काही विद्यार्थांना चांगले गुण प्राप्त झाले  असेल किंवा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे गुण मिळाले नसेल तरीही निराश होऊ नका. कारण कोणतीही एक परीक्षा तुमची गुणवत्ता सिद्ध करू शकत नाही. पण या मार्कातून तुमचा विश्वास ढळू देऊ नका. हे मार्क तुमचं भवितव्य ठरवत नाही. त्यामुळे निराशा झटका आणि कामाला लागा. पुन्हा जोरात तयारी करा अशी तयारी करा की तुमची बरोबरी कोणी करू शकणार नाही. आज आपल्या देशातील अनेक असे महान व्यक्ति आहे की जे आपल्या काही लढायांत अयशस्वी ठरले. मात्र त्यांनी आपली जिद्द न सोडता यश प्राप्त करण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळे ते आज संपूर्ण जगात आपल्या कर्तुत्वाने ओळखले जातात.

आज महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे त्याकरिता सर्व विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना चांदा टू बांदा टिमकडून खूप खूप शुभेच्छा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *