तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारणार ‘मीना’,गूगलने केलं सुपर चॅटबोट लाँच.

तुम्ही आपल्या मोबाइल मध्ये गूगल असिस्टंट चा वापर केला असेलच, पण आता गूगल ने एक नवीन चॅटबोट लाँच ( गुगल असिस्टंट ) केल असून त्याला मीना आस नाव देण्यात आलं आहे. या चॅटबोट मध्ये यूजर्सना हवा तेवढा वेळ ‘मीना’ शी गप्पा मारता येणार आहे. यामध्ये हे चॅटबोट एखाद्या माणसाप्रमाणे उत्तर देईल असं गूगल ने म्हटलं आहे.
    गूगल ने दिलेल्या माहितीनुसार या चॅटबोट वर कोणत्याही विषयावर चर्चा करता येणार असून, तुम्ही या चॅटबोट कडून मदतही घेऊ शकता. या बरोबरच ‘मीना’ तुम्हाला जोक्स सांगून सुद्धा तुमचे मनोरंजन करू शकते. हा चॅटबोट यूजर्सना कधी पासून वापरता येणार आहे याची माहिती गूगलने दिली नसून लवकरच हा चॅटबोट येणार असल्याचे त्यांच्या कडून स्पष्ट करणात आले आहे.

रेल्वे स्थांनाकावरील मोफतचा वायफाय बंद.

गूगलने सुरू केलेल्या रेल्वे स्थांनाकावरील फुकटचा वायफय आता बंद करण्यात आला आहे. ५ वर्षापूर्वी गूगल ने प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा चालू केली होती, आता मात्र देशात इंटरनेट स्वस्त झालं असल्यामुळे गूगल ने आपली रेल्वे स्थांनाकावरील मोफतची वायफाय सेवा बंद केली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा
येथे क्लिक करा : – घडमोडी महाराष्ट्राच्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *