…. तर ही भारतासाठी सुवर्णसंधी ठरेल.:नितिन गडकरी

कोरोनाचा प्रसार संपूर्ण जगात झाल्यामुळे चीनविरुद्ध जगात द्वेष वाढत आहे. त्यामुळे परकीय गुंतवणुकीला आपल्याकडे आकर्षित करून भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक केल्यास ही भारतासाठी सुवर्णसंधी ठरेल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मातृ नितिन गडकरी यांनी परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉंन्फंरंसिंग द्वारे संवाद साधतांना म्हटले आहे.

चीनविरोधात द्वेष वाढत आहे. हे एका संधीत भारताला रूपांतरण करनं शक्य आहे का ? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी नितिन गडकरी यांनी चीनमधून जपानकडून बाहेर पडणार्या. उद्योगांना आर्थिक पॅकेज जाहीर केला जात आहे असा उल्लेख देखील केला होता. तसेच आपण यावर विचार  केला पाहिजे व परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करून परदेशी गुंतवणूकदारांना मंजूरी देऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी जे लागेल ते देण्याची तयारी असायला पाहिजे असे यावेळी केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले. सध्याच्या देशातील स्थितीत सर्व सरकारी कार्यालये, विशेषता अर्थमंत्रालय कोरोंना विरोधात लढत असून पंतप्रधानांचं ५ ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार तयार

बिझनेस टुडे ने दिलेल्या माहिती नुसार परदेशी १००० कंपन्यांची भारतात गुंतवणूकी संबंधी बोलणे चालु असून यापैकी ३०० कंपन्यांबाबत भारत सरकार सकारात्मक विचार करत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर त्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची संधी देण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकार परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी नेहमी प्रयत्नशील असते त्यामुळे या ३०० कंपन्यांना साधी दिली तर भारतात मोबाईल, इलेक्ट्रोनिक्स, वैद्यकीय उपकरणे, वस्त्रोद्योग इत्यादी उद्योग भारतात येईल व भारत पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल. 

ऑनलाईन लुडो खेळणे पडले महागात, पत्नीसोबत हरल्याने पतीने पत्नीच्या पाठीचा कणाच मोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *