… तर भारतात गुंतवणूक करणार चीनमधील एक हजार परदेशी कंपन्या.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश ताळेबंद आहे. परंतु या स्थितही भारतासाठी दिलासादायक बाब समोर येत आहे. याचे कारण म्हणजे चीन मधील एक हजार कंपन्या सध्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी संधी शोधत असून भारतात त्यांना गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्यास त्या कंपन्या भारतात येणार आहे.

चीनमध्ये असणाऱ्या परदेशी कंपन्यांना खूप समस्या भेडसावत असून तेथील परदेशी गुंतवणूकदार चीनमध्ये गुंतवणूक करण्याचा मनःस्थितीत नाही आहे.  बिझनेस टुडे ने दिलेल्या माहिती नुसार परदेशी १००० कंपन्यांची भारतात गुंतवणूकी संबंधी बोलणे चालु असून यापैकी ३०० कंपन्यांबाबत भारत सरकार सकारात्मक विचार करत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर त्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची संधी देण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकार परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी नेहमी प्रयत्नशील असते त्यामुळे या ३०० कंपन्यांना साधी दिली तर भारतात मोबाईल, इलेक्ट्रोनिक्स, वैद्यकीय उपकरणे, वस्त्रोद्योग इत्यादी उद्योग भारतात येईल व भारत पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे चिनला मोठा धक्का बसणार असून चीनचा मनुफॅक्चरींग हब  या प्रतिमेला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे भारतात जर या कंपन्यांना संधी मिळाली तर एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखे होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *