डॉक्टरांवर हल्ला करणे पडणार आता महागात.

डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. डॉक्टरांवर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कदापि सहन करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकार कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर दिली.
डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी मोदी सरकारने नविन अध्यादेश काढला असुन त्यामध्ये दोन लाखांपर्यत दंडाचीही तरतुदही करण्यात आली आहे.

सध्या देशातील सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढत असून आपल्या प्राणाची बाजी लावून सर्व आपल्याला सेवा पुरवत आहे. त्यामुळे त्यांना हिन वागणूक देणे चुकीचे आहे. त्यांना त्यांचा सन्मान मिळालाच पाहिजे आजपर्यंत देशात जे घडले ते दुर्दैव असून यासमोर असे घडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला असून Epidemic Diseases Act, 1897 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर मध्ये ४८ पदांची भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *