ठाकरे सरकारला मोठा धक्का ‘सरपंच पदाची निवडणूक होणार थेट’

फडणवीस सरकारने घेतलेला थेट सरपंच पदाचा निर्णय राज्यात सत्तेत येताच ठाकरे सरकारने बदलण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारने २८ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान रद्द केला. त्यानंतर मात्र जुन्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवळतील या अध्यादेशावर सही करण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे आता राज्यात १५७० ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार असून ती निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे ही निवडणूक जुन्याच पद्धतीने म्हणजे थेट लोकांमधून सरपंच निवडल्या जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का आहे असं म्हाणलं जात आहे. 

या निर्णयामुळे आता येणार्याज निवडणुकीत कोणाला याचा फायदा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय लागू करण्यात आला नसल्यामुळे भाजपला फायदा होईल असा दावा भाजपाकडून केला जात आहे. परंतु याचा खरोखरचं भाजपला फायदा होईल का? याची माहिती निवडणूक निकालानंतरचं माहिती होईल. 
राज्य निवडणूक आयोगाने १९ जिल्ह्यातील १५७० ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यपदाची सार्वत्रिक निवडणूकसाठी अधिसूचना काढली आहे. २९ मार्चला निवडणूक व ३० मार्चला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *