ट्रायचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता मोबाइलचा नंबर होईल ११ आकडी.

आता लवकरच १० अंकांचा मोबाईल नंबर लवकरच ११ अंकांचा होणार आहे. यासाठी सरकारने देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी देशात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरात आणण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. त्या दिशेने काम देखील सुरू करण्यात आलं आहे. ट्रायच्या सांगण्यानुसार १० अंकांच्या मोबाईल नंबरचे रूपांतर ११ अंकांमध्ये करण्यात आलं तर देशात जास्त नंबर सक्रिय करण्यास मदत होईल.

मोबाईल नंबर १० आकडी वरून ११ आकडी झाला तर जादा नंबर उपलब्ध होऊ शकणार आहेत. ट्रायने फिक्स लाईनवरून कॉल करताना मोबाईल नंबरच्या अगोदर शून्य लावण्याचा प्रस्तावही दिला आहे. सध्या फिक्स लाईनवरून शून्य न लावताही थेट मोबाईल नंबर लावता येतो. मात्र शून्य लावले गेले तर २,३,४ व ६ मध्ये सर्व फ्री सबलेव्हल्स, मोबाईल नंबर म्हणून वापरता येणार आहेत.

जर मोबाईल नंबर १० ऐवजी ११ अंकांचा करण्यात आला तर देशात  मोबाईल नंबरची उपवब्धता वाढेल. ट्रायच्या या निर्णयावर जर का शिक्कामोर्तब करण्यात आला तर मोबाईल नंबरचा सुरवातीचा अंक ९ असेल. तर एकूण १० अब्ज मोबाइल नंबर देशात तयार करण्यात सक्षम होतील. असं ट्रायकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *