जिगरबाज पोलिसांमुळे वाचले ८८ लोकांचे प्राण.

अलिबागला निघलेली मांडावा बंदरातील अजंठा कंपनीची बोट आज सकाळी सव्वा दहाच्या निघाली आणि २०० मीटर अंतरावर जाताच  बोट बुडायला लागली त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. मांडावा पोलिस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी एक बोट घेऊन आपले पोलिस अधिकारी प्रशांत घरत यांना तात्काळ पाठवून दिले. बोटींच्या खालश्यांनी प्रशांत घरत यांच्या सोबत जाऊन ८८ प्रवाशांचे प्राण वाचविले आणि त्यांना मांडवा बंदरात सुखरूप पोहचविले. ८० प्रवाशांना पोलिसांच्या तर ८ प्रवाशांना खाजगी बोटीने वाचविण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ८८ प्रवाशांचे प्राण वाचले. देवदूत बनून आलेले घरत आणि बोटींचे खलासी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिष्यवृत्ती महाघोटाळ्याविषयी धक्कादायक खुलासा

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *