जाणून घ्या काय होतील लोकसंख्या वाढीचे परिणाम ?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/

Instagram:-  https://t.me/chandatobanda

लोकसंख्या वाढ ही भारतातील खूप मोठी समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशात विविध समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियत्रित करणे खूप आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रित झाली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील. आज जागतिक पातळीवरचा विचार केला तर लोकसंख्याचा बाबतील भारताचा जगात दूसरा क्रमांक लागतो. व भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा वेग असाच राहीला तर भारत लवकरच जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश ठरेल. २०३० पर्यन्त भारताची लोकसंख्या १.५१ अब्जावर जाईल असा निष्कर्ष समोर येत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीवर तातळीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकसंख्या वाढीची कारणे  

निरक्षरता :- 
                   
पूर्वी भारतात निरक्षरतेचे प्रमाण जास्त होते. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढली व या अंधश्रद्धेमुळे लोकसंख्येत वाढ झाली. वंशाचा दिवा आपल्याला हवा यासाठी पूर्वी जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत कुटुंब नियोजन प्रक्रिया करायची नाही. या सारख्या प्रथांमुळे लोकसंख्या वाढत आहे. आता निरक्षरतेचे प्रमाण कमी झाले असून या समस्या कमी होतांना दिसून येते. मुलींचे अल्प वयात लग्न करून देणे हे देखील एक लोकसंख्या वाढीचे कारण आहे.

जन्म –मृत्यूदर:-
                            आपल्या देशात आरोग्याच्या विविध सोयी  उपलब्ध झाल्यामुळे व आरोग्यासबंधी सोयी स्वस्त झाल्यामुळे मृत्यू दरात कमालीची घाट झाली आहे मात्र जन्म दरात अजूनही घट झाली नाही. त्यामुळे लोकसंख्येत कमालीची वाढ होतआपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे.
  
लोकसंख्या वाढीचे परिणाम 

वाढत्या लोकसंख्येमुळे खूप मोठे परिणाम होत आहे. लोकसंख्येमूळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे कर्ण वाढत्या लोकसंख्येचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडत आहे त्यामुळे देशातील विकासाच्या कामाची गती कमी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या दैनदिन गरजा पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे लोक आज गंभीर समस्यांना तोंड देत आहे. लोकसंख्या जर अशीच वाढत राहली तर रोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल देशात बेरोजगारी वाढेल, वाढत्या बेरोजगारीमुळे गरीबी वाढेल लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, लोकांच गुन्हेगारीकडे कल वाढेल, देशात गुन्हेगारी वाढेल. देशात अस्थिरता निर्माण होईल. गरीबांना चांगले खायला मिळणार नाही त्यामुळे कुपोषांनासारख्या समस्या निर्माण होईल. एकूणच देशाची वाटचाल अधोगतीकडे होईल. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित करणे आज आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकसंख्या वाढीवर काय उपाय करावे? 

जनजागृती :-
                      वाढत्या लोकसंख्येमुळे काय समस्या निर्माण होत आहे याबद्दल जन जागृती करणे गरजेचे आहे. लोकांना त्यांच्यामध्ये जाऊन वाढत्या लोकसंख्येचे परिणाम काय होनार आहे याची माहिती त्यांना द्यावी लागेल. आता सध्या “ हम दो हमारे दो ” ही संकल्पना देशात आहे, परंतु आता ही संकल्पना बदलवावी गरज आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे “ हम दो हमारा एक ” ही संकल्पना आज देशात रुजू करण्याची सक्त गरज आहे. कारण लोकसंख्येच्या वाढीचा वेग खूप गतीने समोर जात आहे, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी हे करणे गरजेचे आहे.

नवीन कायद्याची निर्मिती करावी लागेल. :-
                                                                     लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन लोकसंख्या नियंत्रण कायदा निर्माण करावा लागेल. व त्या कायद्याची अमलबजावणी करून लोकसंख्या नियंत्रणावर भर देण्याची गरज आहे. कुटुंब नियोजन कायदयामध्ये बदल करण्याचीही गरज आहे. आज केवळ एका घरी एकच मूल जन्माला आल पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
           लोकसंख्या वाढ ही अशी समस्या आहे की तीचे तात्काळ निवारण करणे गरजेचे आहे नाही तर या मुळे देशावर समोर चालून खूप मोठे संकट येईल, देशातील लोकसंख्या वाढेल लोकांना वास्तव्य करण्यासाठी जागा मिळणार नाही. लोक जागोजागी वास्तव्य करण्यास सुरवात करतील त्यामुळे शेती साठी जागा राहणार नाही परिणामी देशातील अन्नधान्याचे उत्पन्न कमी होईल व देशात अन्नधान्यांची टंचाई निर्माण होईल. व लोकांवर भुकमारीची पाळी येईल. म्हणून लोकसंख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *