छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात अग्रेसर

अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात राज्य देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यात 2 मार्च 2020 पर्यंत अश्या सुमारे 50,915 सौर यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो.महाराष्ट्रात 5,513 प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
2 मार्च 2020 पर्यंत देशभरात प्रस्थापित करण्यात आलेल्या 79,950 छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांपैकी गुजरातमध्ये 64 टक्के किंवा दोन तृतीयांश प्रकल्प आहेत. यासह राज्यातल्या सौरऊर्जा क्षमतेमध्ये वाढ होऊन ती 177.67 मेगावॅट इतकी झाली. देशभरात प्रस्थापित सर्व प्रकल्पांची एकत्रित क्षमता 322 मेगावॅट इतकी आहे.
गुजरात सरकारची “सूर्य गुजरात” योजना  वर्ष 2022 पर्यंत सुमारे आठ लक्ष वीज ग्राहकांना लाभ देण्याच्या उद्देशाने गुजरात राज्य सरकारने “सूर्य गुजरात” नावाची छतावरील सौरऊर्जा योजना स्वीकारली.राज्य सरकारने या योजनेसाठी  912 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.योजनेनुसार, अश्या प्रकाल्पापासून मिळणारी वीज घरासाठी वापरली जाते आणि अतिरिक्त ऊर्जा प्रति युनिट 2.25 रुपये या दराने राज्य खरेदी करते.तसेच 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी स्थानिक वापरकर्त्यांसाठी प्रकल्पांच्या किंमतीवर 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले गेले, तर 3 ते 10 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ते अनुदान 20 टक्के केली गेले.

येस बँकेवर आलेल्या निर्बंधामुळे शेतकर्‍यांनाही फटका.


महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *