चुका व त्रुटी काढण्याची ही वेळ नाही.: राज ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.  त्या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एमआयएम चे नेते इंतियाज जलील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रासपचे महादेव जानकर शेकापचे नेते जयंत पाटील जोगेंद्र कवाडे विनय कोरे अशोक ढवळे राजेंद्र गवई कपिल पाटील उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी ही वेळही चुका काढण्याची किंवा कमीपणा काढण्याची नसूनही वेळ कोरोना विरूद्ध लढण्याची आहे असे त्यांनी सांगितले बरोबर त्यांनी काही सूचनाही दिल्या आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की त्यांनी काही सूचना केलेल्या आहे आणि त्यांच्या सरकारला त्यांच्या अॅक्झीट प्लॅन काय आहे ? याची विचारणा केली असल्याचे सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना.

  • कन्टेन्मेंट झोनमध्ये फोर्स वाढवण्याची गरज असून काही ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्याची गरज.
  • छोटे दवाखाने सुरू करून तिथे गर्दी होऊ नये म्हणून एका पोलिसाची नेमणूक करावी.
  • स्पर्धा परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी.
  • तपासणी केल्याशिवाय परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊ देऊ नये.
  • महाराष्ट्रातील तरुण व तरुणी पर्यंत रोजगाराची माहिती पोहोचवावी.
  • महापालिका कर्मचारी सफाई कर्मचारी व पोलीस यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
  • शाळेत कशा सुरू करणार? याबाबत पालकांपर्यंत माहिती पोहोचणे आवश्यक.
  • राज्यातून स्थलांतर करणाऱ्या लोकांची नोंदणी व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *