चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या संबंधात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लदाखच्या एलएसी वर चीन आणि भारत यांच्या दरम्यानचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यास रणनीती आखली आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवान यासारखे अनेक देश वैतागलेले आहे. त्याच्या भूमीत चीन सातत्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या देशांनी भारताला समर्थन दिले आहे. 
रशिया आणि अमेरिका सारख्या देशांनी आतापर्यंत सावध पवित्र घेतला होता. पण आता मात्र अमेरिकेने भारताला उघड उघड समर्थन दिलं आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची स्थिती उद्भवल्यास अमेरिकन सैन्य भारताला समर्थन देईल अशी घोषणा व्हाईट हाऊसने सोमवारी केली आहे. तसेच चीनला आशियात दादागिरी करू देणार नसल्याचं देखील यावेळी अमेरिकेने स्पष्ट केल. 
व्हाईट हाऊसने आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर थोड्या वेळातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी देखील ट्विट करत चीनवर निशाणा साधला. त्यांनी चीनमुळे उर्वरित संपूर्ण जगाला खूप मोठ नुकसान सोसावं लागलं असं डोनाल्ट ट्रंप म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *