चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्यांसाठी महाराष्ट्र सज्ज. :- उद्योगमंत्री सुभाष देसाई

संपूर्ण जगात सध्या कोरोनाच्या संकटाने कहर केला असला तरी कोरोनाचे संकट भारतासाठी मोठी संधी घेऊन आले आहे. चीनमधील वुहाण शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण जग सध्या चीन वर नाराज आहे. त्यामुळे चीन मधील बहुतेक गुंतवणूकदार आपली चीनमधील गुंतवणूक काढून दुसर्याळ आशियाई देशांत गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारताला देखील आपल्या देशात गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याची संधी आहे.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी सज्ज असल्याचेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. तसेच करोना संकटामुळे उद्योग क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा. असेही ते यावेळी म्हणाले.

करोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी शेड तयार करण्याचाही निर्णय़ घेतला आहे. गुंतवणूकदार यंत्र-सामग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे. शिवाय मोठ्या गुंतवणूकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे. उद्योग विभागाचा एक अधिकारी त्या गुंतवणूकदारांसोबत पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. आता गुंतवणूकदारांनी पुढे यावे आणि उद्योग सुरू करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले.

राज्यात काल सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याची नोंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *