चांदा टू बांदा हेडलाईन्स,वाचा दिवसभरातील ताज्या घडामोडी थोडक्यात.

* अफवांना बळी पडू नका, विशेष ट्रेन चालणार नाहीः रेल्वे मंत्रालय.
संपूर्ण देशात ३ मेपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. कुठलीही विशेष ट्रेन धावणार नाहीए. रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. तसंच अफवा पसरवू नये, असं आवाहनही रेल्वेने केलंय. रेल्वेच्या बुकींग केलेल्या आधीच्या तिकीटांचे सर्व पैसे प्रवाशांना परत केले जातील, असं रेल्वेने स्पष्ट केलंय.

* परप्रांतीय मजुरांना चिथावणी; विनय दुबेला अटक
‘चलो घर की ओर’ अशी हाक देत परप्रांतीय मजुरांना चिथावणी देणारा व लॉकडाऊनचं उल्लंघन करून वांद्रे येथे गर्दी जमवणारा विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

* देशावर संकट असताना राजकारण करू नका; पवारांचं आवाहन.
देशावर करोनाचं संकट आलं आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच करोनाचा परिणाम सुमारे दोन वर्ष सोसावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

* देशभरात १७० जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट, आरोग्य मंत्रालयाची माहिती.
देशभरातील जिल्ह्यांचं तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

* संकटकाळात मित्रांना मदतीचा हात! रशिया, यूएईला पाठवणार HCQ औषधांचा साठा.
अमेरिका, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांना भारताने सर्वप्रथम हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा केला.

* कपिल वाधवान यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस.
लॉकडाऊनचं उल्लंघन करत मुंबई ते खंडाळा आणि तिथून महाबळेश्वर गाठणारं वाधवान कुटुंब आधीच गोत्यात आलं असताना जामिनावर असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्या अडचणींत भर पडली आहे. ईडीने त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

* ३९ लाख रेल्वे तिकीटे रद्द; मिळणार रिफंड!
रेल्वेने १५ एप्रिल ते ३ मे २०२० या काळात बुक करण्यात आलेले सर्व तिकीटे रद्द केली आहेत. या रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे प्रवाशांना परत मिळतील असे IRCTCने मंगळवारीच सांगितले.

* मुंबईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या दोन हजारच्या उंबरठ्यावर.
महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात मुंबईतील करोनाबाधितांची आकडेवारी चिंतेत भर घालणारी असून मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या जवळ पोहचली आहे.

* हुंड्यासाठी सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या.
हुंड्यासाठी एका सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची विष देऊन हत्या करण्यात आलीय. बिहारमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. माहेरच्या कुटुंबीयांकडून सोन्याची चैन आणि इतर वस्तू मिळाव्यात यासाठी सासरच्या मंडळींकडून सालेहा हिचा छळ सुरू होता.

* १० लाख करदात्यांना मिळाला IT रिफंड.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पाच लाख रुपयांपर्यंतचे प्राप्तिकर परतावे (इन्कम टॅक्स रिफंड) तातडीने देण्याचे निर्देश कर मंडळाला दिले होते. त्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रिफंडची प्रक्रिया जलदगतीने केली. जवळपास १० लाख करदात्यांना कर परतावा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *