चांदा टू बांदा हेडलाईन्स, वाचा आजच्या दिवसभरातील घडामोडी थोडक्यात

* देशात कोरोना रुग्णांची वाढून ४०६७ वर देशातील एकूण रुग्नांपैकी ७६% टक्के रुग्ण पुरुष असून २४% महिला आहे.

* कोल्हापुरात करोनाचा तिसरा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर सांगली येथेही एका महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

* करोना: खासदारांच्या वेतनात वर्षभर ३० टक्क्यांची कपात करोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने खासदारांच्या वर्षभाराच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच दोन वर्षे खासदारांना खासदार निधीही मिळणार नाही. हा सर्व पैसा करोनाविरुद्ध्च्या लढाईसाठी वापरण्यात येणार आहे.

* अडीच वर्षांच्या चिमुरड्यालाही ‘करोना’नं गाठलं
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक अवघ्या अडीच वर्षांचा चिमुरडा करोना पॉझिटिव्ह आढळलाय. उल्लेखनीय म्हणजे, या मुलाची आई तसंच आजी-आजोबादेखील करोनाबाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

* बिग बी उचलणार १ लाख कामगारांच्या रेशनचा खर्च
देशात सध्या करोनाचं अत्यंत गंभीर असं सावट आहे. शक्य तितक्या लवकर देशाला यातून बाहेर पडायचं आहे.यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत.

* बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदर घटवला
सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने रेपो दराशी संलग्न व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात केली आहे. बँकेने MCLR मध्येही ०.२५ टक्के कपात केली आहे. यामुळे एक वर्ष मुदतीचा MCLR आता ८ टक्के झाला आहे. यापूर्वी तो ८.२५ टक्के होता. सहा महिन्यांसाठीचा MCLR ७.८० टक्के केला आहे. यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा यासारख्या बँकांनी कर्जदरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे.

* ‘लढाई संपवायची आहे; लपून बसू नका, स्वत:हून समोर या’
करोनाविरुद्धचा लढा आपल्याला लवकरात लवकर संपवायचा आहे. या कामी सर्वांचं सहकार्य गरजेचं असून करोनाची लक्षण असलेल्यांनी लपून न राहता स्वत:हून पुढं यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *