चांदा टू बांदा हेडलाईन्स, वाचा आजच्या दिवसभरातील घडामोडी थोडक्यात.

*भारतात दिवसभरात आढळले नवे ३५४ रुग्ण

*करोना साखळी तोडणं ही सर्वांची जबाबदारी: अजित पवार
सरकारने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

*देशात ४,४२१ करोनाचे रुग्ण,
देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४,४२१ वर पोहोचली आहे. तर एकूण १४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

*एका रुग्णामुळे ४०६ जणांना होते करोनाची लागण.
आयसीएमआरने दिलेल्या नियमांचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे आणि लॉकडाऊनचे पालन करोना रुग्णाने न केल्यास त्याच्यामुळे ३० दिवसांत तब्बल ४०६ जणांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील करोना रुग्णांची संख्या ४,४२१ वर गेली आहे. यात गेल्या २४ तासांतील ३५४ नव्या रुग्णांचाही समावेश आहे.

*देशात वाढू शकतो लॉकडाउन; केंद्रात विचार सुरू
देशात सुरू असलेला लॉकडाउन आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. अनेक राज्य सरकारे आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारला तशी विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे.

*मुलीने घेतले व्हिडीओकॉलद्वारे आईचे अंत्यदर्शन.
जीवघेण्या करोना व्हायरसमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून संचारबंदीमुळे नागरिकांना बाहेरही फिरता येत नाही. त्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे. साताऱ्यात एका मुलीला तर तिच्या आईच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलेलं नाही. तिने व्हिडिओ कॉलिंगद्वारेच आईचं अंत्यदर्शन घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

*भारताने अखेर औषध निर्यात बंदी उठवली.
भारताने औषधांच्या निर्यातीवर घातलेली बंदी पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीवजा इशारा दिला होता. पण केंद्र सरकारने देशातील औषधांचा पुरवठा किती शिल्लक आहे याचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी आता उठवण्यात आली असून आवश्यक ती औषधं शेजारी राष्ट्रांसह अमेरिकेलाही पुरवली जाणार आहेत.

*औषधांचा पुरवठा करु, राजकारण करु नका, भारताने अमेरिकेला सुनावलं.
‘भारत आपल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल.’

* MPSC पूर्व परीक्षा अखेर लांबणीवर
देशातील संपूर्ण लॉकडाऊनचा हा १४ वा दिवस आहे. लॉकडाऊननंतर करोनाच्या फैलावाला काही प्रमाणात आळा बसला असला तरी रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होतच आहे. राज्यात ही संख्या ८९१ वर पोहोचली आहे.

*कौतुकास्पद! चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला.
या मुलाचं सगळीकडेच कौतुक होतं आहे.आंध्रप्रदेशातल्या एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. हेमंत असं याच वर्षांच्या मुलाचं नाव आहे चार वर्षांच्या हेमंतचं सगळीकडे कौतुक होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *