चांदा टू बांदा हेडलाईन्स, वाचा आजच्या दिवसभरातील घडामोडी थोडक्यात.

*’घाबरू नका, करोनाचा सामूहिक संसर्ग नाही’
करोना विरोधी लढाईत वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, कर्मचारी आणि पथकं हे आपले आघाडीचे शिलेदार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याशी गैरवर्तन किंवा त्यांच्यावरील हल्ल्यांमुळे समाजाचं आणि देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसंच यामुळे त्यांचं मनोबल खचेल. देशाला १ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची गरज आहे. आपल्याकडे सध्या ३.२८ कोटी इतका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा साठा आहे, असं अग्रवाल म्हणाले.

*लॉकडाऊन: कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांवर गुन्हा
दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंच्या अडचणी वाढल्या आहेत. खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करून जिल्हाबंदी आदेश मोडल्याप्रकरणी कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाधवान यांच्या पाच आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत.

*केंद्रामार्फत गुप्तांना बडतर्फ करा: देशमुख
कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याच्या बडतर्फीचे अधिकार राज्य सरकारला नाही. हे अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या बडतर्फीची कारवाई भाजपने केंद्रामार्फत करावी, असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्यावरील कारवाईचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे.

*करदात्यांना दिलासा ; रिफंड तातडीने मिळणार
कर परताव्याची प्रतीक्षा करणाऱ्या छोट्या करदात्यांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पाच लाख रुपयांपर्यंतचे आयकर परतावे (इन्कम टॅक्स रिफंड) तातडीने देण्याचे निर्देश कर मंडळाला दिले आहेत. एकूण १८ हजार कोटींचा परतावा आयकर विभागाकडून करदात्यांना दिला जाणार आहे.

*’भारत मित्रांसाठी शक्य आहे ते सर्व करेल’ पंतप्रधान मोदींचा इस्रायलला संदेश
‘या कठिण काळात आपल्या मित्रांच्या मदतीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व भारत करायला तयार आहे’

*करोना:वैद्यकीय उपकरणांवरील शुल्क रद्द
करोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सरकारने मास्क, व्हेंटीलेटर्स, करोना चाचणी किट यासारख्या उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द केले आहे. यामुळे या उत्पादनांची कमी किंमतीत आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

*उद्धव ठाकरे हे चांगलं काम करताहेत: पंकजा मुंडे
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व अन्य मान्यवरांनंतर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलंय. ते परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळताहेत,’ असं पंकजांनी म्हटलं आहे.

*सोनं महागले;कमाॅडिटी बाजारात तेजी कायम
सराफा बाजारात सोने दरात १०० रुपयांची वाढ झाली. मुंबईत सोन्याचा भाव ४२९९० रुपये झाला. चांदीचा भाव प्रती किलोला ४०९९० रुपये होता. करोनामुळे देशभरात सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे कमाॅडिटी बाजाराला मोठा फटका बसला आहे. भांडवली बाजारात अनिश्चितता असल्याने गुंतवणहकदार धास्तावले आहेत. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षिक होत आहेत.

*सचिनकडून ५ हजार लोकांना महिन्याभराचे धान्य!
करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हातावर पोट असलेल्या लोकांना बसला आहे. अशा गरीब लोकांच्या मदतीला अनेक जण पुढाकार घेत आहेत.

*अक्षय कुमारकडून BMCला तीन कोटींची मदत
महाराष्ट्रात गुरुवारी एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं करोनाबाधितांचा आकडा १३६४ झाला आहे. त्यात मुंबईतील ७४६ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य राखीव दलाची (SRPF) मदत घेऊन लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

*गुडन्यूज: भारतातले ४०० जिल्हे करोनामुक्त!
भारतात एकूण ७१८ जिल्हे आहे. त्यापैंकी ४०० जिल्हे अद्याप करोनामुक्त आहेत. देशात आत्तापर्यंत ६४१२ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत तसंच १९९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

*मुंबईत करोनाचे ९९३ रुग्ण; दिवसभरात १० जण दगावले.
मुंबईत करोना साथीचा धोका वाढत चालला आहे. शहर व उपगनरांत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून आज दिवसभरात तब्बल २१८ नवीन करोनाबाधीत रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

*करोनाचे संकट; ‘ADB’ची भारताला मदत
करोनाशी लढण्यासाठी आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताला १६ हजार ५०० कोटींची (२.२ अब्ज डॉलर्स) मदत घोषीत केली आहे. यापूर्वी वर्ल्ड बँकेने भारताला ७ हजार ५०० कोटींची (१ अब्ज डॉलर) मदत दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *