चांदा टू बांदा हेडलाईन्स, वाचा आजच्या दिवसभरातील घडामोडी थोडक्यात.

१)राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम: मुख्यमंत्री
राज्यातील लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही कायम राहणार आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हे युद्ध आहे, ते आपण जिंकूच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२)मुंबईत ७० % करोनाबाधीत रुग्णांत सौम्य लक्षणे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना आज करोनाबाबत अत्यंत महत्त्वाचा तपशील दिला. प्रामुख्याने मुंबईसाठी त्यात थोडीशी दिलासा देणारी बाब असून मुंबईतील बहुतांश करोनाबाधीत रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

३)“आयुष्यभर राजकारण सोडून दुसरं काय केलं? पण या गोष्टीत मला राजकारण नकोय”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना दिली समज.

४)सरकारने बोलावल्यास मदतीसाठी तयार-राजन
करोनापुढे सारे जग हतबल झाले आहे. २०० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला असून अपरिमित आर्थिक नुकसान आगामी काळात सोसावं लागणार आहे. भारतालाही करोना व्हायरसची झळ बसत आहे. अशा संकटकाळात अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जर सरकारकडून विचारणा झाली तर नक्कीच मदत करू, अशी तयारी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दर्शवली आहे.

५)मालेगाव: पोलिसानं गोळी झाडून केली आत्महत्या
एका पोलीस उपनिरीक्षकानं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मालेगावमध्ये घडली. या घटनेनं संपूर्ण मालेगाव शहर हादरून गेलं आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

६)करोना संकट:भारतीय औषधे ब्रिटनला रवाना.
औषध निर्मितीत आघाडीवर असलेल्या भारताने करोनाच्या संकटकाळात पाश्चिमात्य देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेपाठोपाठ केंद्र सरकारने युनायटेड किंगडम (ब्रिटन) औषधांची निर्यात केली आहे. पॅरासिटामोल या गोळ्यांची जवळपास ३० लाख पाकिटे शनिवारी ब्रिटनला रवाना करण्यात आली. उद्या म्हणजेच रविवारी ती ब्रिटिश सरकारला प्राप्त होणार आहेत.

७)’लॉकडाऊन नसता तर ८ लाख रुग्ण असते’
भारताने इतर देशांच्या तुलनेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येत आहेत. देशात लॉकडाऊन घोषित केला नसता आणि प्रादुर्भाव असलेल्या भागांना वेळेवर सील केले नसते तर करोना रुग्णांची संख्या ८ लाखांवर पोहोचली असती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

८)मी २४X७ उपलब्ध, पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन.
करोना लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जावा किंवा नाही? किंवा याबद्दल आणखी काय पर्याय असू शकतात? याबद्दल चर्चा करण्यासाठी तसंच राज्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

९) तुम्हाला कसे मारतो ते संपूर्ण जगाला दाखवणार, भारताचा पाकिस्तानला इशारा.
भारताने ही कारवाई करुन काश्मीरच्या केरान सेक्टरमध्ये शहीद झालेल्या पाच पॅरा कमांडोंच्या मृत्यूचा बदला घेतला.

१०) धारावीत फैलावतोय करोना; ४ मृत्यू, २८ रुग्ण.
धारावीतील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, करोनानं बळी घेतलेल्यांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. तर आज नव्याने सहा रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *