चांदा टू बांदा हेडलाईन्स, वाचा आजच्या दिवसभरातील घडामोडी थोडक्यात.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारकडून या लॉकडाऊनमध्ये काही सवलती दिल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

*करोना: अमेरिकेत भारताची ‘संजीवनी’ दाखल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चेदरम्यान एचसीक्यूवरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली होती. भारत या गोळ्यांचा मोठा उत्पादक देश आहे. जगातील हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा ७० टक्के पुरवठा भारतातून होतो. त्याच्या निर्यातीवरील बंदी भारताने ७ एप्रिलला उठवली होती.

*फक्त गरिबांसाठीच मोफत करोना चाचणी: SC
करोना विषाणू चाचणीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नव्या आदेशानुसार आता देशात करोना विषाणूच्या मोफत चाचणीचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील, ईडब्ल्यूएस आणि आयुष्मान भारतचा लाभ घेणारेच घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आता सरसकट सर्वांना मोफत चाचणी करता येणार नाही.

*‘लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्यांच्या अन्न-सुरक्षेची काळजी घ्या’ सोनियांचे मोदींना पत्र.
लॉकडाउनचे सर्वाधिक चटके हे हातावरचं पोट असलेल्यांना बसले आहेत.

* ३२ कोटी कुटुंबांना दिले २८,२५६ कोटी रुपये
केंद्रातील मोदी सरकारने गरीब, शेतकरी आणि मजूरांच्या खात्यात आतापर्यंत २८ हजार २५६ कोटी इतकी रक्कम जमा केली आहे याचा फायदा देशातील ३२ हजार कुटुंबीयांना झाला आहे.

* गुड न्यूज! २५ जिल्ह्यांत करोनाचा नवीन रुग्ण नाही
आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण आढळलेले नाहीत. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

* २४ तासांत दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा झटका
भूकंपासाठी अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दिल्लीत रविवारी पहिल्यांदा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर २४ तासांच्या आत सोमवारीही दुसरा भूकंपाचा झटका जाणवला. करोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच चिंतेत असलेले नागरिक भूकंपानं आणखीन धास्तावलेत.

* पंतप्रधान मोदी उद्या करणार महत्त्वाची घोषणा; सकाळी १० वाजता देशवासीयांशी साधणार संवाद
१४ एप्रिलला सकाळी दहा वाजता पंतप्रधान देशातील जनतेशी साधणार संवाद.

* हजारो अमेरिकन्स म्हणतात, ‘घर नको; भारतच बरा’
सध्या २४ हजार पेक्षा जास्त नागरिक भारतात आहेत. अमेरिकन सरकारकडून या नागरिकांना आपल्या घरी नेण्यासाठी विशेष विमानाची सोय केली जात आहे. पण अमेरिकेतला करोनाचा कहर पाहता हे नागरिक भारतात राहण्यालाच पसंती देत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत लाखो नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे ४४४ नागरिक मायदेशी परतले आहेत.

गुगल CEO सुंदर पिचाईंकडून भारताला ५ कोटी!
करोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *