चांदा टू बांदा हेडलाईन्स,वाचा दिवसभरातील ताज्या घडामोडी थोडक्यात

* देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत; मोदींची घोषणा
देशव्यापी लॉकडाऊनच्या २१ व्या दिवशी करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर १०३६ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी देशात ३ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली.

* अमेरिका भारताला कोट्यवधी डॉलर किंमतीची क्षेपणास्त्रे देणार.
भारताला अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलरची क्षेपणास्त्रे देण्यात येणार आहे. भारत-अमेरिकेत झालेल्या करारानुसार ही क्षेपणास्त्रे विक्री करण्यात येणार आहे. क्षेपणास्त्रांमुळे भारताच्या सागरी सुरक्षिता आणखी मजबूत होणार आहे.

* Coronavirus : हॉटस्पॉट ओळखून ‘स्मार्ट’ पद्धतीनं तोडगा काढणं आवश्यक – राहुल गांधी
लॉकडाउनमुळे सर्वांसमोर मोठी समस्या उभी राहिल्याचं ते म्हणाले.

* रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला करोना
कोकणातही हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यासाठी धोका वाढताना दिसत आहे. सर्वकाही नियंत्रणात आहे असे वाटत असतानाच आता अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाला करोनाची लागण झाल्याने सारेच चिंतेत पडले आहेत.

* राज ठाकरेंना खटकली मदतकार्यातील फोटो काढणे.
लॉकडाऊनमुळं अडचणीत असलेल्या गरजू लोकांना मदत करताना त्याची अनावश्यक प्रसिद्धी करणं टाळा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह अन्य मदतकर्त्यांना केलं आहे.

* १० जिल्ह्यांत व्यवहार सुरू करण्याचा विचार
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध उपाययोजना केल्या आहेत. राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दैनंदिन व्यवहार आणि उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळं अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात आणि काही निर्णय घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली.

* जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही – अमित शाह
सर्व राज्य सरकारे ज्या पद्धतीने, केंद्र सरकारसोबत मिळून काम करत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे असे अमित शाह म्हणाले.

* नागपुरात ९ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५६वर
विदर्भात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोना विषाणूची साखळी आणखी घट्ट झाली आहे. आज दिवसभरात आणखी नऊ रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५६वर पोहोचली आहे.

* लॉकडाऊन:परराज्यातील हजारो मजुरांचा वांद्रे स्टेशनबाहेर ठिय्या.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुंबईत अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांत अस्वस्थता वाढली आहे.

* ‘करोनाची साखळी तुटण्यास लागतात २८ दिवस’
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि सर्व नियमांचे पालन केल्यास करोनाचा प्रादुर्भाव थांबून साखळी तुटेल. असं झाल्यास जिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे २८ दिवसांत नवीन रुग्ण आढळलाच नाही तर करोनाची साखळी तुटली असं स्पष्ट होतं, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.

* वांद्रेतील घटनेनंतर शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्यानंतर मुंबईत वांद्रे येथे इतर राज्यांतील मजुरांनी गर्दी करत ठिय्या आंदोलन केलं. इतर राज्यांमधील हजारो मजुरांनी गर्दी केल्याने वांद्रे पश्चिम भागात दुपारी चार वाजता तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी चर्चा करत आणि सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण एवढ्या मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर आल्याने केंद्र सरकारने या घटनेची दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *