चक्रीवादळाच्या मदतीवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने

रायगड जिल्ह्यात आलेल्या चक्रीवाळामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. यासाठी राज्य सरकार कडून मदत घोषित करण्यात आली होती. याच मदतीवरून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभा वाद निर्माण झाला आहे. सरकार आणि सामाजिक संस्थांकडून आलेली मदत फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच वाटली जाते, असा आरोप थेट शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगडे यांनी हा आरोप केला आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सरकारी अधिकारीही मदत वाटताना पक्षपाती पणा करत आहेत, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

तहसीलदार आणि राष्ट्रवादीच्या प्रांत पुढाऱ्यांमार्फत साहित्य वाटप करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं फक्त श्रीमंत लोकांनाच धान्य देत आहेत. त्यांच्या लोकांनाच मदत दिली जात आहे आणि ही मदतही त्यांच्याच घरी ठेवली जात आहे. तहसीलदार आणि प्रांत यांना खासदार आणि पालकमंत्री हे करायला लावत आहेत. पालकमंत्र्यांना फक्त आपला पक्ष दिसत आहे. हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत का पक्षाचे आहेत,’ अशी टीका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *