चंद्रपूरात पुन्हा दारूविक्री सुरू होण्याचे संकेत !

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

पाच वर्षापूर्वी चंद्रपूरात दारूबंदीचा निर्णय घेतला. गेल्या कित्येक वर्षा पासून दारू बंदीची मागणी चंद्रपूरात होत होती. त्यासाठी विविध मोर्चे निघाली. उपोषणे ही झाली, काही महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी आपले मुंडनही करून घेतले दारूबंदीची मागणी वेग धरू लागली. त्याच मागणीच्या अनुषंगाने भाजपा सरकारने चंद्रपूरत दारू बंदी केली.

        परंतु चंद्रपूरात अवैध दारूविक्रि व महसूल नुकसानीमुळे ठाकरे सरकार चंद्रपूरातील दारूबंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत  आहे. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अधिकार्यां ची चर्चा झाल्याच्या वृत्ताने लोकांमध्ये खमंग चर्चा होत आहे.

दारूबंदीमुळे गेल्या पाच वर्षात चंद्रपुर जिल्ह्यातील २०० कोटी रूपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु दारूबंदी हटवणे खरच शक्य आहे का ? चंद्रपूरातील दारू खरच चालू होईल का ? अशा विविध चर्चांना सध्या खूप उधाण आल्याचे दिसते . तर अवैध दारू विक्री करणार्‍या तळीरामांना चिंता चालू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *