चंद्रपूरकरांनो धोका अजूनही टळला नाही जिल्ह्यात आज एका नवीन कोरोना रुग्णांची भर.

चंद्रपूर जिल्ह्यातील ७ रुग्ण मंगळवार दिनांक २ जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. त्यातच आता चंद्रपुरात एका नवीन रुग्णांची भर झाली आहे. ३१ मे रोजी मुंबईवरून निघालेला हा व्यक्ती १ जून रोजी चंद्रपूरला पोहचला. जुनोना रोड शिवाजी नगर चंद्रपूर येथील या व्यक्तीने दुपारी लक्षणे आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क केला. या ठिकाणी कोविड आयसोलेशन वार्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.१ जूनला सायंकाळी स्वॅब घेण्यात आले.
२ जूनला रात्री उशिरा त्यांच्या अहवाल पॉझिटीव्ह आला. सदर व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर काही वेळ घरी गेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई – वडिल , पत्नी, मुलगी यांचाही स्वॅब घेण्यात येणार आहे.

आतापर्यंत एकूण २० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ आहे.  जिल्ह्यातील कोविड-१९ ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत १ हजार १३ स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह २३ नमुने, निगेटिव्ह ९०६ नमुने तर ८४ नमुने प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्तरावर ३ हजार ११० नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर ३०६ नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर ३२२ नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील ३ हजार ७३८ नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७३ हजार ६७९ नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, ६५ हजार ६७२ नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर ८ हजार ७ नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. रुग्णांची संख्या कमी झाली असली नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *