चंद्रपूरकरांना मोठा दिलासा….! काल एका दिवशी १० रुग्णांची कोरोनावर मात.

सुरवातीला ग्रीन झोन असणाऱ्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि एकापाठोपाठ एक रुग्ण वाढू लागले होते. चंद्रपुरातील कोरोनाबाधीतांची संख्या २२ वर पोहचली होती.  त्यामुळे चंद्रपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. आता मात्र चंद्रपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण काल एका दिवशी चंद्रपुरातील १० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याआधीही चंद्रपुरातील दोन कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे आता चंद्रपुरातील एकूण १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात सध्या १० अॅक्टिव रुग्ण आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १२ रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काल दिली. जिल्ह्यातील एकूण ९०६ स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह २२ नमुने असून निगेटिव्ह ८१७ आहे तर ६७ नमुने प्रतीक्षेत आहेत. काल १० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने चंद्रपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण १० कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदर झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *