चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला, २३ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण.

‌चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला असून २३ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर मुलगी ही चंद्रपुरातील बिनबा परिसरातील असून ती ९ तारखेला यवतमाळ वरून चंद्रपूरला आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या मुलीचे स्वॅप ११ तारखेला घेतला असून आज दुपारी ती व्यक्ती कोरोना पाॅझीटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांचे स्वॅप घेण्यात येत असून सदर व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिली आहे .

‌रुग्णाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले असून संबंधित परिसर सिल करण्यात आला आहे. संबंधित परिसरातील नागरिकांना पुढील १४ दिवसांसाठी निगरणीत ठेवण्यात येणार असून त्या परिसरात केवळ अत्यावश्यक सेवा असणारे दुकाने चालू राहतील. सदर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध चालू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी सांगितले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून संचार बंदी लागू करण्यात आली असून ४ मेच्या अगोदर ज्याप्रमाणे संचारबंदी चालू होती तसेच यापुढे तीन दिवस संचारबंदी राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

‌यापूर्वीही चंद्रपुरात एक रुग्ण सापडला होता. कृष्णनगर एक  इसम पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांची स्थिती स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेले एकही जण पॉझिटिव्ह आला नाही. अशातच दुसरा रुग्ण आढळला शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *