घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोनाग्रस्त व्यक्त केल्या आपल्या भावना,

सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगत चालू आहे. कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमंडली असून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर कोरोना झालेल्या रुग्णांनी आपली भावना व्यक्त केल्या. आता आमची प्रकृती पूर्वरत होत असून गेल्या 4-5 दिवसांपासून ठणठणीत असल्याचे जाणवत असून त्यांनी संर्वांना घाबरून जाऊ नका फक्त स्वत:ची काळजी घ्या असे म्हटले

काय म्हणाले कोरोनाग्रस्त रुग्ण

‘ परदेशातून आल्यानंतर ताप आल्याने डॉक्टरांकडे गेले. त्यांना कोरोनाची चाचणी करायला सांगितले चाचणी पॉजिटिव आली. त्यानंतर तातळीने रुग्णालयात भरती करण्यात आले. कोरोना झाला तर खूप त्रास होतो अशी माहिती येत होती, मात्र प्रत्यक्षात असे काहीच नाही. डॉक्टर आमची छान काळजी घेत आहे , रोज ते काही अंतरावरून आमची चाचणी करत असून टेंशन घ्यायचे नाही, पथ्य पदाचे नाही, सकारात्मक विचार करायचा, असे सांगून आम्हाला बळ देत आहे .’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे.
सध्याचा परिस्थिति लक्षात घेता सर्व नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक असून सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तेव्हा नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, शासनाने दिलेले सर्व आदेश पाळावे. आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ची काळजी घेणे हाच एक उत्तम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

बिल गेट्स यांनी Microsoft’ला ठोकला रामराम, समाजसेवा करण्याचा मानस.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *