घराबाहेर पडू नका अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्यात येईल: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

राज्यातील कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व पालघर येथे घटलेल्या घटनेवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. काल दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काही ग्रीन झोन मधील काही व्यवसायांना अंशतः सूट दिली होती मात्र लोकांनी संकट टळले असे समजू नये. लॉक डाऊन उठवला नसून हा राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. कोरोणा विरूद्ध ची लढाई ही सध्याच्या परिस्थितीतील प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे लोकांनी घरा बाहेर निघू नये. नियम पाळले नाही तर पुन्हा निर्बंध लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालघर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून त्या भागात असलेल्या चोरांच्या अफवेमुळे घडली असून सरकार यावर चूप नाही. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. माॅब ब्लींचींग सारखी घटना महाराष्ट्रात घडणे हे दुर्दैव आहे. पालघर मधील गडचींचोली मध्ये घडलेल्या घटनेची माहिती होताच पहाटे ५ वाजतापासून तपास चालू झाला. पोलिस अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे. पालघर मध्ये घडलेली घटना ही सांप्रदायिक नसून ती चोरांच्या अफवेमुळे झाली आहे त्यामुळे धर्माधर्मात आग लावण्याचा प्रयत्न करू नये. असेही यावेळी मुख्यमंत्री उध्दव यांनी सांगितले.

पालघरमध्ये झालेल्या घटनेविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांच्या सोबत चर्चा झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *