घरगुती गॅसच्या किंमती आजपासून वाढल्या, जाणून घ्या नवीन दर.

देशात कोरोंनाचे संकट असतांनाच आता सर्वसामान्य जनतेला आता महागाईचे चटके सहन करावे लागणार आहे. कारण आज पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारोपेठेत वाढलेल्या गॅसच्या किंमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ होणार आहे.

इंडियन ऑइलने दिलेल्या माहीतीनुसार दिल्लीत गॅसची किंमत आता ११.५० रुपयांनी वाढणार असून आता गॅसची किंमत ५९२ रुपये झाली आहे. कोलकत्ता मध्ये गॅसची किंमत ६१६ रुपये इतकी झाली आहे. मुंबईत देखील गॅसच्या किंमतीत वाढ झाली असून आता गॅस सिलेंडर सोडविण्यासाठी ग्राहकांना ५९०.५० रुपये मोजावे लागणार आहे. 

पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या दर वाढीचा कोणताही परिणाम होणार नसून लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत विनामूल्य गॅस सिलेंडर मिळणार आहे. मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या दरात घाट झाल्याने गॅसच्या किंमतीत ७४४ वरुण ५८१ एवढी घट झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *