घटनात्मक अडचणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केवळ दोनच महीने आमदारकी मिळण्याची शक्यता.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदर व्यक्तिला सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवळून येण बंधनकारक असतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि आता त्यांच्या कडे आमदारकी मिळविण्यासाठी २८ मे पर्यंतचा वेळ आहे. परंतु सध्या संपूर्ण जगात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व निवळणूका स्थगित केल्याने आता विधानपरिषदेची निवळणूक होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे कल राज्याच्या मंत्रीमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून पाठविण्याची शिफारस केली आहे.

सध्या उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवळ झाली तरी त्यामध्ये अनेक घटनात्मक अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या दोन जागा रिक्त आहेत. पण या दोनही जागांची मुदत संपतेय 6 जूनला. नव्या आमदारांना उरलेली टर्मच आमदारकी मिळते. त्यामुळे जर राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली तरी उद्धव ठाकरेंची आमदारकी ही दोनच महिन्यांकरता असणार आहे. 6 जूनला ही मुदत संपल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांच्या आत त्यांना आमदार म्हणून निवडून यावं लागेल. गेल्या चार महिन्यांपासून राज्यपाल नियुक्तीसाठी सरकारने दिलेली दोन नावं मान्य होत नव्हती. शिवाय जून महिन्यांत एकाचवेळी अशा 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा रिक्त होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल नियुक्तीसाठी नाव पुढे करुन आघाडी सरकारने एक प्रकारे आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात टाकला आहे.

कोरोना संकटाच्या काळात धीरोदात्तपणे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे सध्या अनेकांच्या कौतुकाचा विषय बनले आहेत. अशा वेळी त्यांचं नाव नाकारल्यास त्याचा रोष राज्यपालांवर आणि अप्रत्यक्षपणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर येऊ शकतो. शिवाय ही नियुक्ती मार्गी लावल्यानंतर पुढच्या 12 जणांच्या नियुक्तीचा मार्गही सोपा व्हावा, त्याबाबत निकषाचे कारण लावता येऊ नये हा देखील महाविकास आघाडीचा अंतस्थ हेतू आहेच. सरकारने पाठवलेली नावं नाकारुन राज्यपाल आपल्या मर्जीने कुणाची नियुक्ती करु शकत नाहीत. पण जी नावं आली आहेत ती निकषात बसत नाहीत असं सांगून पुनर्विचारासाठी पाठवू शकतात किंवा बराच काळ प्रलंबितही ठेवू शकतात. त्यामुळे कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोड्या अडचनिंचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *