ग्रीन झोन असलेल्या वर्ध्यातही कोरोनाचा शिरकाव, ३५ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोरोना रिपोर्ट पोझीटीव्ह.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना वर्धा जिल्हा मात्र कोरोनामुक्त होता. आता मात्र प्रत्येक जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर आज या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता ग्रीन झोन मध्येही कोरोना शिरकाव करत आहे.

या महिलेचा रिपोर्टमुळे गेल्या दीड महिन्यापासून ग्रीन झोन असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ दिला नाही. मात्र आता 35 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. कोणाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ बैठक आयोजित केलेल्या आहे. सदर महिला संपर्कात येणाऱ्या लोकांची माहिती घेत असून त्यांची तपासणी घेण्यात येणार आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाकडून संचारबंदी कडक करण्याची तयारी केली असून पुढील दोन दिवस कडक संचारबंदी राहणार आहे.  जिल्ह्यात मेडीकल दुकानं आणि रुग्णालयं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिली आहे.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कंटेनमेंट झोन निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *