ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु करा. : सिंधुताई आस्वले

कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडीत होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे ही बाब कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले यांना लक्षात येताच तात्काळ अभियंत्यांना पत्र लिहून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी मागणी केली आहे.
 
त्याचबरोबर पावसाळ्यात विद्युत विभागाला येणाऱ्या समस्याच्या उपाययोजना आताच कराव्या जेणेकरून पुढे चालून त्रास होणार नाही. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी हजर राहून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची दखल घेत आताच यावर उपाययोजना करावी तसेच वनसडी येथील विद्युत पुरवठा कोरपना येथून जोडण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी उपसभापती सिंधुताई आस्वले यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचे नवीन हंगाम आता चालू होत असून पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यास त्यांना आपले पीक वाचविण्यासाठी पाणी चालू करावे लागणार त्यामुळे शेती संबंधी विजेचीही पूर्व तयारी करावी अशीही मागणी कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *