ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ववत सुरू करत मिरची व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करा: – अँड. संजय धोटे

ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासमोर येणाऱ्या संकटाचा सामना करत शेती संबंधित अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालास चालना देणे आवश्यक आहे. राजुरा  विधानसभा क्षेत्रात कापूस उत्पादक तथा मिरची उत्पादक शेतकरी भरपूर आहे. सदर मालाची खरेदी विक्री व्यवहार बंद असुन या संबंधित बाजारमूल्य खरेदी व्यवहार सुरू करणे आवश्यक आहे. शेतमाल घरी टाकुन असुन बाजारात विक्रीसाठी येण्यासाठी तथा योग्य स्वरूपात त्याचा विल्हेवाट व्हायला पाहिजे. तसेच सद्यस्थितीत नागपूर येथील कळमना मिरची बाजारपेठ बंद असुन शेतकऱ्यांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ मध्ये जाण्यास परवानगी नसल्याने दलालाच्या माध्यमातून व्यवहार होताना शेतकऱ्यांना नुकसान होणे नाकारता येत नाहीत करिता खरेदी व्यवहार सुरू करावे.
तसेच जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना पूर्ववत काम सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याच अनुषंगाने येणाऱ्या एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात येणार असून टंचाईग्रस्त गावाना त्याचा त्रास होतो. माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याद्वारा मंजूर असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व पंतप्रधान खनिज प्रतिष्ठान निधी योजनेतील टंचाई ग्रस्त गावातील पाणी पुरवठा योजणा पुर्वत्वत सुरू कराव्या म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्या योजनाची कामे सद्यस्थितीत पुर्णत्वास झाली नसल्याने तथा समोर येणाऱ्या पाणी समस्याला तोंड देण्यासाठी आज यावर त्वरित उपाययोजना करुन सदर बंद बसलेली कामे पुन्हा सुरू करावी जेनेकरून ग्रामीण भागातील जनतेला मुलभुत पाणी समस्या होणार नाहीत . आदिवासी नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील अनेक गावाना पाण्याच्या  बाबतीत  समस्या निर्माण होत असतात तरीही या सर्व बाबतीत निवारण करण्यात यावे. अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
सद्याची परिस्थिती लक्षात घेता Covid -19 या संकटाशी सगळ जग लढत आहेत. या लढाईत युवकांची भूमिका खूप मोलाची आहे . काही युवक स्वयं स्पृतीने या लढाईत खारीचा का होईना आपला श्रम रूपी वाट देत आहे या होतकरू युवकांचा मदतीने पुढील काही काळात मदत होत असेल तर स्वयसेवक म्हणून जील्याला मदत  होईल तर नक्की करून घ्यावा.

महत्वाची बातमी..! ग्राहकांनी वीजबिलासाठी स्वत: मिटरचे रीडिंग घेऊन पाठवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *