गौतम गंभीर ने स्वीकारली मृत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाची जबाबदारी.

भारताचा सलामीवीर गौतम गंभीर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर आपल्या धडाकेबाज फलंदाजी सोबतच आता राजकरणात आल्यानंतर आपल्या धडाकेबाज निर्णयांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता गौतम गंभीर याने एक मोठी जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे त्याचा कामाचे कौतुक देशभरात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिस दल आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पण त्याच्या जीवाची काळजी मात्र योग्यपद्धतीने घेतली जात नाही असे दिसत आहे. कारण पोलिस दलातील बऱ्याच जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांचा जीवही धोक्यात आला आहे. दिल्लीमध्ये पोलिस दलातील अमित कुमार यांचे निधन झाले. यावर गंभीरने दु:ख व्यक्त केले आहे, त्याचबरोबर केजरीवाल सरकारवर टीकाही केली आहे. पण पण टीका करून गंभीर थांबलेला नाही. त्याने यापुढे जाऊन एक जबाबदारीही घेतलेली आहे. त्यामुळे आता गंभीरचे देशभरात कौतुक होत आहे.

अमित कुमार यांच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून याची माहिती गौतम गंभीर याने ट्विट करून दिली आहे. “प्रशासन, यंत्रणा आणि दिल्ली करोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेले आहे. पोलिस दलातील अमित कुमार यांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांना आपण परत आणू शकत नाही. पण त्यांच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे मी ठरवले आहे. माझ्या मुलासारखीच मी त्याची काळजी घेईन. गौतम गंभीर फाऊंडेशन हे अमित यांच्या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलणार आहे.” असे त्याने ट्विट द्वारे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *