गेल्या सात दिवसांतील भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक.

भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतातील लॉकडाउन मध्ये शिथिलता आल्यामुळे भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. भारतात सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या २,३६,६५७ वर पोहोचली आहे. भारत कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत जगात सहाव्या स्थानी आला आहे. मागील सात दिवसांत भारतात ६२ हजार लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

भारतात एकूण ६६४२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण आकड्यापैकी १ लाख १४ हजार ७३ रुग्णांनी कोरोंनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात ९८८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४६११ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोंनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचा वेग देखील वाढला आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित


• अमेरिका:  कोरोनाबाधित- 19,65,708  मृत्यू- 111,390
• ब्राझील:   कोरोनाबाधित- 646,006 ,  मृत्यू- 35,047
• रशिया: कोरोनाबाधित- 449,834 ,  मृत्यू- 5,528
• स्पेन:  कोरोनाबाधित- 288,058 , मृत्यू- 27,134
• यूके:  कोरोनाबाधित- 283,311,   मृत्यू- 40,261
• भारत : कोरोनाबाधित- 236,184, मृत्यू- 6,649
• इटली:  कोरोनाबाधित- 234,531 ,मृत्यू- 33,774
• पेरू:   कोरोनाबाधित- 187,400 , मृत्यू- 5,162
• जर्मनी: कोरोनाबाधित- 185,414, मृत्यू- 8,763
• टर्की:  कोरोनाबाधित- 168,340 , मृत्यू- 4,648

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *