गॅसच्या दरात मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू.

सलग दुसर्‍या महिन्यात गॅसच्या दरात घसरण झाली असून बुधवार सकाळपासून नवीन दर लागू करण्यात आले आहे. विना अनुदानीत गॅसच्या किंमतीत ६२ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात गॅसधारकांना थोडा दिलासा मिळणार आहे.
 आयओसी चे जनरल मॅनेजर अरुण प्रसाद यांनी दिलेल्या माहिती नुसार व्यावसायिक सिलेंडर ( १९ किलो ) मध्येही ९६ रुपये कमी करण्यात आले आहे. सर्वसामान्य गॅसधारकांना आता २६३ रुपये अनुदान दिले जाणार आहे ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे त्यांना गॅस सिलेंडर ५१६ रुपयांत पडेल.
गॅस सिलेंडरचे नवीन दर
१४.२ किलो – ७७९.०० रुपये
५ किलो – २८६.५० रुपये
१९ किलो १३६९.५० रुपये

गावकर्‍यांनी लढवली शक्कल, विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची काढणार गाढवावर धिंड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *