गॅसच्या किंमतीत मोठी कपात, ‘असे’ आहे गॅसचे नवीन दर.

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. आता मात्र सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण विनाअनुदानीत गॅसच्या किंमतीत कपात करण्यात येणार आहे. १ मार्च पासून म्हणजे आजपासून गॅसची किंमत ५३ रुपयांनी कमी झाली आहे. सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. ऑगस्ट २०१९ नंतर ही गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी आज पासून स्वस्त झाला आहे. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ६ वेळा दरवाढ झाली होती. १ जानेवारीच्या बजेट पूर्वी गॅसच्या किंमती भडकल्या होत्या आता त्या पार्श्वभूमीवर गॅसच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामानांच्या खिश्याला दिलासा मिळणार आहे.
असे आहे गॅसचे नवीन दर 
दिल्लीत विनाअनुदानित ८०५.५०, कोलकत्ता मध्ये ८३९.५०. मुंबईमध्ये ७७६.५०आणि चेन्नईमध्ये ८२६ आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *