गूड न्यूज…! मुंबईतील ३१ पत्रकारांनी केली कोरोनावर मात.

राज्यातील ग्राउंड लेवलवर जाऊन घडणाऱ्या घडामोडींची माहिती देणाऱ्या ३१ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली होती. निर्भिडपणे कुठेही जाऊन बातमी घेणाऱ्या पत्रकारांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोना वर मात करणाऱ्या पत्रकारांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना आता १४ दिवसांचा होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना बधितांचा आकडा जरी वाढत असला तरी कोरोना पासून मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.  मुंबईमध्ये अनेक कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत असून प्रत्येक घडामोडींची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपड करणाऱ्या पत्रकार व कॅमेरामॅ‌न यांना कोरोनाने ग्रासले होते. एकूण ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती त्यातील ३१ पत्रकार कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून बाहेर आल्या नंतर टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

दिलासादायक….! आता दुरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *