गूगल सर्चवर मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ चा बोलबाला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली. त्यामुळे देशातील विविध राज्यातील लोकांनी आत्मनिर्भर चा अर्थ काय आहे यासाठी निर्भर या शब्दासंदर्भातील सर्च सर्वाधिक वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील १२ तासांमध्ये या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली या पाच राज्यांमधील लोकांनी सर्वाधिक प्रयत्न केल्याचे गुगल ट्रेण्डसवरुन दिसून येत आहे.

आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ जाणून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक दक्षिण भारतामधील राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर या शब्दाचा अर्थ जाणून घेणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असल्याचे गुगल ट्रेण्ड्सवरुन स्पष्ट होत आहे. तर पहिल्यास्थानी कर्नाटकमधून असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमाकांवर गोवा, तिसऱ्यावर महाराष्ट्र, चौथ्यावर तेलंगणा तर पाचव्यास्थानी राजधानी दिल्ली असल्याचे गुगल ट्रेण्ड्सवरुन स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, बिहार, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांचा क्रमांक लागतो.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कोरोनाच्या संकटातून काढण्यासाठी व देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. तेव्हापासूनच गूगल वर हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता गूगल सर्च वर देखील मोदींच्या आत्मनिर्भर योजनेचा बोलबाला दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *