गावकर्‍यांनी लढवली शक्कल, विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची काढणार गाढवावर धिंड.

सध्या देशात तसेच राज्यात लॉकडाउन घोषित कार्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे, मात्र नागरिक काहींनाकाही बहाणा काढून घराबाहेर पडत आहे त्यामुळे आता आता बीड मधील केज तालुक्यातील टाकळी गावातील गावकर्‍यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. जर एखादा व्यक्ति तीनपेक्षा अधिक वेळा घराबाहेर पडला तर त्याला ५०० रुपये दंड आकरण्यात येणार आहे. आणि तोच व्यक्ति चौथ्यांदा घराबाहेर पडला तर त्याची गाढवावर धिंड काढण्याचा निर्णय गावातील सरपंच व गावकर्‍यांनी घेतला आहे.

टाकळी गावातील नागरिकांना वारंवार सूचना देऊनही ते विनाकारण घराबाहेर पडून टवाळ्क्या करतांना दिसून आले. त्यामुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गावामध्ये दवंडी देऊन हा निर्णय गावकर्यां पर्यंत पोहचविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सरपंचाने गावातील पारांवर गप्पा मारणार्‍यांना देखील छाप दिला आहे. दिवसेनदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंद्र व राज्य शासन या विषाणूला रोखण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांना नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. 

विनाकारण बाहेर पडणार्‍यांना पोलिसांचा दणका, ४ तासात केल्या तब्बल ३०० गाड्या जप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *