खिलाडी अक्षय कुमार कडून मुंबई पोलिस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत.

देशावर कोरोनाचे संकट आले असतांना बॉलीवूड मधून सर्वात पहिले अक्षय कुमार मदतीसाठी समोर आला होता. मागील महिन्यात त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत केली होती. त्यानंतर त्याने कोरोनाशी लढणार्‍या बीएमसीला ३ कोटी रुपयांची मदत केली होती व आता ज्यांच्या संपूर्ण मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे अशा दिवसरात्र काम करणार्‍या मुंबई पोलिस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत केली असून त्याने आपल्या या सामाजिक आपुलकी तून दाखवून दिले की तोच खरा खिलाडी आहे.

पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी अक्षय कुमार याने केकेल्या मदतीची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर वरुण दिली आहे. “मुंबई पोलीस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत दिल्याबद्दल मुंबई पोलीस अक्षय कुमार यांचे आभार मानते. आपले योगदान मुंबई पोलीसांच्या त्या महिला व पुरुषांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करेल, जे आपल्या सेवेसाठी कटीबद्ध आहे” असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. या ट्विटला अक्षय कुमार याने उत्तर दिले असून त्याने कोरोनामुळे आपले प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

…. तर ही भारतासाठी सुवर्णसंधी ठरेल.:नितिन गडकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *