कौतुकास्पद..! १० मजले धावत चढून ‘त्याने’ तिरंग्याला आगीत जळण्यापासून वाचविले.

जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर सोमवारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागली. धुराचे लोळ निघताच कर्मचार्‍यांना आपआपल्या मजल्याबरून खाली जाण्यास सांगितले. सर्व कर्मचारी घरी जयला लागले, मात्र तेथील काही कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात व्यस्त होते, तितक्यातच एकाने आवाज दिला अरे तिरंग्याच काय? तेवढ्यात तिथे उपस्थित असलेल्या जीएसटी भवन मध्ये काम करणाऱ्या कुणालने एका क्षणाचाही विचार न करता तो जिन्याकडे धावला. एका दमात त्याने ८ मजले चढला. पण आग नवव्या मजल्यावर लागली असल्यामुळे तिथे धुराचे लोळ त्याचाकडे येऊ लागले. कुणाल ने जीवाची पर्वा न करता मजले चढायला सुरवात केली. समोर त्याला त्याचे २ साथीदार भेटले व तिघांनी मिळून तिरंग्याला सन्मानपूर्वक खाली उतरविले. कुणालची ही कामगिरी एखाद्या विरला शोभेल अशीच आहे. त्याच्या ह्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्या जीवाची बाजी लावून कुणाल जाधव ने आपला तिरंगा सुरक्षित खाली उतरवला त्यातून भारतीयांसाठी तिरंगा हा आपल्या प्राणापेक्षा जास्त महत्वाचा आहे ही भावना दिसून आली. कुणालने केलेल्या ह्या कामगिरी बद्दल आमच्या चांदा तू बांदा टिम कडून मनापासून ‘सल्यूट’
मित्रा तू आम्हा सर्वांचे मन जिंकलास……

One Comment on “कौतुकास्पद..! १० मजले धावत चढून ‘त्याने’ तिरंग्याला आगीत जळण्यापासून वाचविले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *