कौतुकास्पद….! बीडमधील ७ वीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा पराक्रम.

लहान मुलांची विचारशक्ती ही अपार असते याचीच प्रचिती बीडमध्ये पाहायला मिळाली. महराष्ट्रातील काही ठिकाणी वीज पुरवठा खूप वेळा खंडित होत असतो. परंतु  यावेळी आपण सामान्यता अंधारातच राहतो अथवा घरी बॅटरी चा उपयोग करतो, परंतु बीड मधील ७ व्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी जे केले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

बीडमधील कुर्ला या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची वीज ही विजबिल थकीत असल्यामुळे शाळेतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अंधारात बसून शिक्षण घ्यावे लागत होते. त्यावर ७ वीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने अवघ्या ५ दिवसात पवन चक्की तयार केली. व संपूर्ण शाळेतील अंधार नाहीसा केला.

पहिले या मुलांनी आपल्या शाळेतील वीज पवनचक्की मार्फत येऊ शकते असे संगितले. त्यावर शिक्षकाने सुद्धा त्या मुलांच्या भावनांचा विचार करून त्यांना या उपक्रमात मदत केली व शाळेतील विजेची समस्या सोडविण्यासाठी पवनचक्की तयार केली. या उपक्रमाला त्यांना ५ हजार रुपये लागले असून मुलांमध्ये नवीन काहीतरी करण्याची आवड निर्माण होईल या दृष्टीकोणातून हा उपक्रम केला असल्याचे त्यांच्या शिक्षकाने संगितले. लहान मुलांच्या या पराक्रमाची प्रसंशा सर्वांकडून होत आहे. 

उद्यापासून होणार १० वी च्या परीक्षेला सुरवात,पेपरला जातांना घ्या ‘ ही ’ काळजी.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *