कौतुकास्पद…! कुटुंबाचे ओझे पेलत ती झाली ‘पोलिस उपनिरीक्षक’.

एखाद्यात जिद्द असेल आणि काही करून दाखवायची इच्छा असेल तर ती व्यक्ति कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तुत्व सिद्द करून दाखवते. याचेच उदाहरण आता एमपीएससी च्या लागलेल्या निकालातून दिसून आले. जिद्द, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर संसाराचे ओझे पेलत अश्विनी जाधव-डवरी यांनी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्यांचे हे यश व जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. विवाहानंतर आपली संसारीक जबाबदारी पार पाडत हे यश संपादन केल्यामुळे अश्विनी जाधव यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
अश्विनी यांना पहिल्यांदा मुख्य परीक्षेत अपयश आले तरी देखील त्यांनी खचून न जाता आपली तयारी चालूच ठेवली व दुसर्याीच प्रयत्नात अश्विनी यांनी पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. पहिल्या प्रयत्नानंतर चार वर्षाचा खंड पडला. मात्र पुन्हा मुलीच्या जन्मानंतर अभ्यास चालू केला व यश संपादन केले. 
अश्विनी जाधव ह्या कोल्हापूर मधील वाळवा तालुक्यातील रेठरे या गावातील असून त्यांचा खाजगी नोकरी करत असून त्यांचे वडील हे तांबट व्यावसायिक आहे. संसार सांभाळून पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा पास झाल्याने खूप आनंद झाला असून या पदावर मी रुजू होणार असल्याचे अश्विनी यांनी सांगितले.
अथक प्रयत्न, जिद्द व चिकाटीने पोलिस उपनिरीक्षक पद प्राप्त करणार्याप अश्विनी जाधव यांना चांदा टू बांदा टिमकडून मनापासून  ‘सलाम’

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

रोगप्रतिकारक शक्ति वाढवा, कोरोनाला पळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *